आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या अन्यायावर 2, 3 चित्रपट निघतील:मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात, म्हणाले -  मला निवडून येण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ शिवसैनिकांना वर्षा बंगल्यावरुन परत जावे लागत होते. आम्ही कार्यकर्त्यांचे दु:ख दूर करू शकत नव्हतो, मदत करू शकत नव्हतो. आमदारांचे अस्तित्व धोक्यात आल्यावरही सहाय्य करु शकत नसेल तर सत्ता आणि पद काय कामाचे? आमच्यावरील अन्यायाचे 2, 3 चित्रपट काढावे लागतील, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

पुरंदरमधील सासवड येथे शेतकरी जनसंवाद मेळाव्यातील जाहीर सभेत शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, मविआमध्ये सत्ता नेमकी कोणाची हे समजत नव्हते. राष्ट्रवादी व काँग्रेस हे बेदखल होते असताना त्यांना महाविकास आघाडीतून संजीवीनी मिळाली. युतीचे सरकार झाले असते तर हे दोन्ही पक्ष औषधालादेखील उरले नसते. बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुध्द लढून जिंका, अशी शिकवण दिली. मात्र, आमच्यावरील अन्यायाचे दोन, तीन चित्रपट काढावे लागतील.

केसरकर संत माणूस

शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दीघेंचे कार्य जनमाणसात पोहोचवणेही काही जणांना रुचले नाही. आम्ही निघून गेल्यावर राजकीय आत्महत्या केल्याची टिका केली जात होती. दिपक केसरकर नावाचा सज्जन संत माणूस आम्हाला भेटला. समोरुन काही बोलले तरी ते व्यवस्थित उत्तर देत होते. ते अडगळीत होते. परंतु, आता ते बरोबर काम करु लागले. आम्ही गद्दार असतो तर राज्यातील जनेतेने आम्हाला समर्थन दिले असते का? असा प्रश्न शिंदेंनी केला.

निवडुून येण्यास चिन्हाची गरज नाही

शिंदे म्हणाले, देशातील राजकारणात प्रथमच सत्तेतील लोक माझ्यासोबत आले. मला निवडून येण्यास कोणत्या चिन्हाची गरज लागत नाही. माझ्या एकटयाचा विषय सोडा जे माझ्याकडे अनेक लोक येतात ते वेदना सांगतात. त्याची दखल घेणे गरजेचे होते. उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हाताच्या बोटावर मोजण्याइतके निवडून आले असते. त्यामुळे सत्तांतराचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. अनेक तक्रारी श्रेष्ठींकडे करुनही शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले, खोटया केसेसना सामोरे जावे लागले, गुन्हे दाखल होऊ लागले, विकासनिधी मिळत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांना बोलवून पक्षात येण्याचे आमंत्रण देत होता. मोक्का, तडीपारच्या केसेस सुनावण्या गृहमंत्र्यांकडे लावून देतो, अशी भाषा वापरत होते.

गोष्टी सहन करण्यापलीकडे

शिंदे म्हणाले, शासन लोकांपर्यंत संवाद साधण्यासाठी आपण नाशिक, संभाजीनगर आणि पुणे विभागात प्रत्यक्ष जाऊन आढावा बैठक, अतिवृष्टी झालेल्या शेतीचे नुकसान, जनावरे हानी, जिवित हानी, घरांची पडझड, इतर विषय याबाबत आढावा घेत आहे. 2019 च्या निवडणुकीत काम करताना सेना-भाजपने एकत्रित काम केले आणि तशाप्रकारे निवडणुकीत मतदान केले. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून आपण निवडणुक लढल्या. निवडणुकीनंतर जनतेने आपणास कौल दिला. दोन्ही पक्ष बहुमताने निवडून दिले सर्वांना वाटले होते की, दोघांचे मिळून सरकार स्थापन होईल. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सर्वांना ही बाब मंजूर नव्हती. शिंदे साहेब हे थांबवा, वाचवा, आपला विश्वासघात होईल, नुकसान होईल असे अनेकांनी मला सांगितले. परंतु आदेशाप्रमाणे आम्ही काम केले व पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले. ज्यांना वाईट अनुभव येत होते ते सर्वजण मला येऊन भेटत होते. कारण मला केवळ भेटण्यास वेळ होता. सरकार, सत्ता व त्याचे काम आणि एकटयाचे काम यात फरक असतो. आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अनुभव येत होता. पुरंदरमध्ये बापू शिवतारे यांचा निवडणुकीत पराभव झाला. सहन करण्याच्या पलीकडे गोष्टी गेल्या होत्या.

यावेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार शहाजी बापू पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, दिलीप लांडे, आमदार भीमराव तापकीर, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व्यासपीठावर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...