आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या:टीव्हीवर मुख्यमंत्री शिंदे कुणाच्या ना कुणाच्या घरीच दिसतात

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून राज्यातील सरकार ओरबाडून आणले गेलेय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यांत काही काम होताना दिसत नाही. ज्या उत्साहाने आमचे सरकार पाडले त्या उत्साहाने कामे होत नाहीत. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केली.

सुळे म्हणाल्या, गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात, असा चिमटाही सुळे यांनी काढला. त्या म्हणाल्या, राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करत होते. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मीटिंग व्हायच्या. आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत.

राज्यात फक्त गाठीभेटीच : गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. बहुतेक त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे.

राज्याला मागच्या अडीच महिन्यांपासून पालकमंत्री नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असेही सुळे म्हणाल्या.

राम शिंदेंचेही स्वागत राम शिंदे बारामती पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांचे मनापासून स्वागत करते. बारामती पाहण्यासारखी आहे. नरेंद्रभाई मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत येऊन गेले. मी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करेन. त्यांना कोणती संस्था पाहायची असेल तर मी त्यांना स्वत: घेऊन जाईल, असेही सुळे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...