आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज्याच्या राजकारणात 25-30 वर्षांपूर्वी आम्ही नको ती अंडी उबवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात देखील इन्क्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला लगावला. बारामती येथे अॅग्रिक्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर याेजनेअंर्तगत उभारलेल्या इन्क्युबेशन, इनाेव्हेशन व विज्ञान संशाेधन केंद्राच्या उद‌्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे बाेलत हाेते. या वेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गाेऱ्हे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पशुसंर्वधन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे,उद्याेगपती बाबा कल्याणी, अतुल किर्लाेस्कर, राजेंद्र पवार उपस्थित हाेते.

या वेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटे काढले. मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आराेप केल्यानंतर प्रत्युत्तरात फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण बाॅम्ब फाेडू असे वक्तव्य सोमवारी केले होते. त्याचा समाचारही ठाकरेंनी घेतला. बाॅम्ब फाेडा पण धूर काढू नका, अजून काेराेना संपुष्टात आलेला नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना दिला.

विकासाला पाठिंबा द्या, विघ्ने आणू नका
राजकारणात एकमेकांचे पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही आपली संस्कृती असू शकत नाही. विकासकामाला पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्ने आणता कामा नये. आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...