आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील लाेहगाव परिसरात एअरफाेर्स स्टेशन जवळ कटिंगच्या दुकानात गेलेल्या सात वर्षाच्या मुलावर दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित मुलाच्या वडीलांनी याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आराेपी सज्जन सहेआलम सलमानी (वय-20,रा.लाेहगाव,पुणे) या आराेपीस पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची घटना सात नाेव्हेंबर राेजी घडली असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. पिडित मुलाचे वडील एअरफाेर्स स्टेशन परिसरात काम करत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी त्यांच्या पत्नीने त्यांचा अल्पवयीन सात वर्षाच्या मुलास केस कापण्यासाठी जवळच्या सलून मध्ये नेले हाेते. सदर ठिकाणी असलेल्या सलून मध्ये घेऊन जाऊन मुलास एकटयाला सलून मध्ये केस कापण्यासाठी साेडून त्या कामासाठी घरी परत आल्या हाेत्या. त्यावेळी सलुन मध्ये अल्पवयीन मुलगा एकटा असल्याचा फायदा घेऊन सलून दुकानदाराने मुलास सलुन मधील आताील खाेलीत घेवून गेला. त्याठिकाणी ताे विवस्त्र हाेत त्याने मुलाशी लैंगिक अत्याचार केले. मुलाने त्यास नकार दिल्याने आराेपीने ही गाेष्ट काेणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र, याप्रकाराने मुलगा घाबरल्याने त्याने घरी गेल्यानंतर पालकांना संबंधित प्रकार सांगितला आणि ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एन पाठक करत आहे. ्र
लग्नाचे अमिषाने तरुणीवर अत्याचार
घराजवळ राहणाऱ्या ओळख निर्माण झालेल्या एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासाेबत शारिरिक संबंध ठेवले. शारिरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ नकळत काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन, पोलिसात तक्रार दिली तर संबंधित व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपी जाहिद शाफिक सय्यद (वय-22,रा.काेंढवा,पुणे) याचे विराेधात काेंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी मंगळवारी दिली आहे. सदरचा प्रकार 17 /5/2022 ते जुलै २०२२ यादरम्यना घडला असून संबंधित तरुणीने पोलिसांकडे आराेपी विराेधात अर्ज दिल्यानंतर त्याची चाैकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.