आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंत्री चंद्रकांत पाटील यांची मी महात्मा फुले यांच्याशी तुलना केलेली नव्हती. परंतु तरी काही रिकामटेकडे याबाबत वाद करतात. स्त्री सन्मान केवळ बुके देऊन कशासाठी तर महिलांना ही पुरुषांनी ओवळले तर यात काय वाईट आहे, असे माझे मत आहे. याबाबत माझ्या बोलण्याचा अर्थ काही वाईट पद्धतीने घेतात ते केवळ बडबड करतात.एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सांगितले म्हणून मला पाच पुरुषांनी ओवाळले तर अशी प्रथा सुरू करण्यात नवीन पायंडा चांगला आहे असे मी बोलले होते. महात्मा फुले यांनी ही सावित्रीबाई फुले यांना पुढे करून आदर्श निर्माण केला होता असे मत भारतीय जनता पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथे सेंट्रल पार्क येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तर्फे महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठक आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपच्या राज्यस्तरीय पदाधिकारी आणि केंद्रीय समितीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
वाघ म्हणाल्या, भाजप महिला आघाडी मोर्चाची माझ्या नेतृत्वात ही पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये विविध विषयवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बदलते प्रश्नबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन बैठकीत केले आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाबाबत त्या म्हणाल्या, नागपूर मध्ये आमचा पक्षाचा उमेदवार उभा नव्हता आणि अमरावती जागा कशामुळे गेली याबाबत आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आम्ही करू आणि पुढील वेळी पुन्हा नक्की विजय मिळवणे दृष्टीने प्रयत्न करू. प्रत्येक निवडणूक आम्हाला महत्वाची असते त्यादृष्टीने आम्ही सदैव कार्यरत राहत असतो.
महिला मंत्री राज्यात पदावर असाव्यात या मताचे आम्ही आहे. इतर पक्षाची तुलना करता, महिला आमदार सर्वाधिक भाजपकडे आहे. त्या केवळ एक टर्म आमदार नाही तर दोन ते तीन टर्म आमदार पदावर आहे. केवळ महिलांकडे महिला आणि बाल कल्याण मंत्रिपद नसावे तर पुरुष मंत्री यांनी ही हे पद सांभाळावे म्हणजे त्यांना महिलांचे प्रश्न समजतील. सध्या मंगलप्रभात लोढा हे खाते सांभाळत असून त्यांना ही महिलांचे प्रश्न समजत आहे. आमच्या नेत्या पंकजा मुंडे या पाटोदा येथे एका भूमिपूजन कार्यक्रमात आहे त्यामुळे त्या बैठकीत येऊ शकल्या नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.