आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रिय औद्योगीक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) काम करणार्या महिला कर्मचार्याने आत्मत्या केल्यानंतर दोन तासानंतरच एका जवानानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. ही घटना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सीआयएसएफच्या कॉर्टरमध्ये घडल्याचे परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांनी सांगितले असून याबाबत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवार यांनी सांगितले की,, आत्महत्या करणारी संबंधीत महिला कर्मचारी आणि जवान हे सीआयएसएफमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या कॉर्टरमध्ये असताना बुधवारी सकाळी संबंधीत महिला कर्मचार्यांने सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. ही आत्महत्येची घटना सर्वाना कळण्याअगोदरच दोन तासापूर्वी संबंधीत जवानाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याचे ते म्हणाले.
या घटनेत दोघांच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजु शकले नाही. या घटनेची माहिती घेण्यासाठी विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
एकाच दिवशी झालेल्या दोन आत्महत्यांमागील कारण पोलिसांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवल्याचे दिसून येत आहे. जाधव यांच्याशी संपर्क न झाल्याने आत्महत्या केलेल्या दोघांची रात्री उशीरापर्यंत नावे समजु शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.