आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी, 85 टक्के काम पूर्ण:सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक 3 किमीची चाचणी  पुणे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या ११.४ किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हरहेड विद्युत तारा आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. मंगळवारी रेंजहिल डेपो ते रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुणे मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे. पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...