आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:काेविशील्ड नावावरून काेर्टात सीरमविरुद्ध दावा, कुटिस बायाेटेकने दाखल केली तक्रार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राेटे यांच्या न्यायालयाने तक्रार दाखल करून घेत याबाबत सीरमला नाेटीस बजावली अाहे.

कोरोना प्रतिबंधक म्हणून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची ‘काेविशील्ड’ लस लवकरच सर्वसामान्यांकरिता उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असताना सीरमने लसीकरिता वापरलेल्या ‘काेविशील्ड’ नावावर अाक्षेप घेण्यात अाला अाहे. नांदेड येथील कुटिस बायाेटेक कंपनीने याबाबत पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. राेटे यांच्या न्यायालयाने तक्रार दाखल करून घेत याबाबत सीरमला नाेटीस बजावली अाहे.

कुटिस बायाेटेक कंपनीच्या संचालिका अर्चना अाशिष काबरा यांनी याप्रकरणी सीरम संस्थेविराेधात अॅड. अादित्य यांच्या माध्यमातून पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे. कुटिस बायाेटेक कंपनी हँड सॅनिटायझर, फ्रुट्स अँड व्हेज वाॅशिंग लिक्विड, अँटिसेप्टिक लिक्विड, सरफेस डिकन्टामेंट स्प्रे ही उत्पादने बाजारात ‘काेविशिल्ड’ ब्रँडच्या नावाने विक्री करत अाहे. कोविशील्ड नावाने त्यांनी २९ एप्रिल २०२० राेजी फार्मास्युटिकल उत्पादने विक्रीसाठी अर्ज केला. ३० मे २०२० राेजी काेविशील्ड ट्रेडमार्कने उत्पादने विक्री सुरू केली. परंतु सीरमने ३ जून २०२० राेजी काेविशील्ड नावाने लस बाजारात विक्रीसाठी आणण्याकरिता अर्ज केला असून अद्याप लस बाजारात येऊ शकलेली नाही. सीरमच्या अाधीच काेविशील्ड नावाचा वापर अाम्ही सुरू केला असून सीरमने लसीसाठी दुसऱ्या नावाचा वापर करावा, अशी मागणी कुटिसने न्यायालयात केली आहे. कुटिस बायाेटेक कंपनीची २०२० मध्ये नोंदणी झालेली असून २०१३ पासून फार्मास्युटिकल उत्पादनांचा व्यवसाय करत अाहे.

बातम्या आणखी आहेत...