आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:येरवडा कारागृहात ऑनलाइन सुनावणीला जाणाऱ्या कैद्यांत हाणामारी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा कारागृहात न्यायालयीन सुनावणीस ऑनलाइन व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याकरिता जात असलेल्या कैद्यांशी दाेघांनी भांडणे करून मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आरबाज बशीर शेख व सलमान बशीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कैदी देवा जमादार याने आराेपीविराेधात तक्रार दाखल केली आहे. देवानंद हा येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे, तर आराेपी आरबाज शेख व सलमान शेख हे रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून माेक्कामधील न्यायबंदी आहेत. तक्रारदार कैदी देवानंदचा मित्र अॅन्सन पाॅल याने आरबाज शेख व सलमान शेखविराेधात केस दाखल केली. त्यात संबंधित आराेपी न्यायालयीन बंदी आहे. ८ ऑगस्ट राेजी दुपारी चार वाजेच्या सुमारास येरवडा कारागृहातील व्हीसी काेर्ट गेटसमाेर देवानंद जमादार याचे नाव व्हीसी काेर्टसाठी पुकारले गेले. तो जात असताना संबंधित आराेपींनी जमादार यास केस मागे घेण्यास सांगितले. पण त्याने नकार दिल्याने आराेपींनी त्यास हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केले.

बातम्या आणखी आहेत...