आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पूर्णवेळ शाळा भरणार:कोरोनाची परिस्थिती पाहता पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरु झाली आहे. त्यावेळेस शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

रुग्णसंख्येत घट, मात्र...
सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजची कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात आणि जगात हिच परिस्थिती आहे.

यावर टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कदम म्हणाले की, या परिस्थितीमागे काय कारण आहे हे आम्हीसुद्धी शोधतोय कारण गेले काही दिवस रुग्णसंख्येत वाढ नाही मात्र कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथील करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान, पुण्यातील कोरोना अजून संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर शहरातील निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

शहरात जंबो कोवीड सेंटर सध्या उभे असले तरी त्यात रुग्ण नाहीत. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येणार आहेत. पुण्यात अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...