आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Clean Chit To Sanjay Rathore In Pooja Chavan Death Case; Demand Of 6 Saints Of Pohardevi To Be Included In The Cabinet |marathi News

क्लीन चिट:पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट; मंत्रिमंडळात घेण्याची पोहरादेवीच्या 6 संतांची मागणी

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा खून झाला नसून अकस्मात मृत्यू असल्याचे पुणे पोलिसांच्या समरी अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना एक प्रकारे क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पोहरादेवी येथील सहा संत तसेच अखिल भारतीय बंजारा सेवा संघाने केली आहे. मागणी करणाऱ्यांत बाबूसिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जितू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज आदींचा समावेश आहे.

खून नव्हे, अकस्मात मृत्यू
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूंनी तपास केला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे यासंदर्भात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, मृत मुलीचे आई-वडील, नातेवाईक यांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल याचीही तपासणी करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती २१ एप्रिल २०२२ रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...