आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम:12 ट्रॅक्टर ट्रॉली कचरा काढला भरून; एमआयडीसी कर्मचाऱ्यांचाही होता सहभाग

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी मध्ये शुक्रवारी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे राजीव गांधी इन्फोटेक पार्क स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवली. यावेळी विविध आयटी कंपनी मधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने जमून त्यांनी रस्त्यावर पडलेला कचरा, कागद आणि इतर कचरा साफ केला. या स्वच्छता मोहीमे दरम्यान सुमारे 12 ट्रॅक्टर ट्रॉली भरून कचरा उचलण्यात आला आहे.

आयटी कर्मचाऱ्यांन सोबत एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने या स्वच्छ्ता मोहिमेला जोड दिली. यावेळी भरलेल्या कचऱ्याच्या पिशव्या गोळा करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीने वाहने उपलब्ध करून दिली होती. या मोहिमेनंतर सर्व सहभागी इन्फोसिस फेज एक येथे जमले.हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सीईओ कर्नल चरणजीत सिंग भोगल आणि असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णन सुब्रमण्यन यांनी त्यांना संबोधित केले. सुब्रमण्यन म्हणाले, आपल्या आयटी पार्क मधील स्वच्छता करणे ही एक छोटीशी सुरुवात आहे जी भविष्यात ही मोहीम अधिक व्यापक बनवेल . याप्रसंगी असोसिएशनच्या स्वच्छ आणि हरित समितीच्या अध्यक्षा मनीषा भोसले यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने नियोजनपूर्वक गतिमान कारवाई केली असून केवळ दीड महिन्यात 27,980 नवी कनेक्शन दिली आहेत. शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण वेगाने प्रयत्न करत आहे, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी दिली.

शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. त्याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार महावितरणने विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली.

महावितरणने 31 मार्च 2022 अखेर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित 1,80,106 अर्जांपैकी 82,584 कनेक्शन एप्रिल 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत दिली आहेत. यापैकी 27,980 जोडण्या या नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचे पंधरा दिवस या पंचेचाळीस दिवस एवढ्या कमी कालावधीत दिल्या आहेत. महावितरणचे याबाबत केलेले नियोजन पूर्ण झाले असून अंमलबजावणीची गती वाढल्यामुळे नवीन कृषी पंप कनेक्शन देण्याचा वेग वाढला आहे. महावितरण या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत आणखी 1 लाख कृषी पंप जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...