आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दाेन लाखांची लाच मागणारा कोर्टातील लिपिक जेरबंद

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा न्यायालयातील एका वरिष्ठ लिपिकाने एका प्रकरणात मदत करण्यासाठी तब्बल दाेन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी दीड लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठाेकल्या आहेत. सचिन अशाेक देठे (३९, रा. राजगुरुनगर, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

याप्रकरणी आराेपी सचिन देठेविराेधात शिवाजीनगर पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणाने पाेलिसांकडे आराेपीविराेधात तक्रार दाखल केली आहे. सचिन देठे हा पुणे जिल्हा न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. पाेलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांचा मावसभाऊ याची एका प्रकरणातून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयातील क्लार्क सचिन देडे याने ३० नाेव्हेंबर राेजी दाेन लाख रुपये लाचेची मागणी केली हाेती. याबाबत तरुणाने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर एक डिसेंबर राेजी त्याला पैसे घेताना पकडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...