आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिर्यारोहकांसाठी खूश खबर:तब्बल 8 महिन्यांनंतर पुण्यात गिर्यारोहणाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, मात्र अटीशर्तींचे करावे लागणार पालन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार

अनलॉकची सुरुवात पुण्यात गिर्यारोहणाला परवागनी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत. मात्र, गिर्यारोहणासाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत.

अनलॉकची घोषणा झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरू केल्या. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्याजवळच्या गड-किल्ल्यांवरील गिर्यारोहणाला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी काही नियमही घालून देण्यात आले आहेत.

गिर्यारोहणासाठी नियम

ट्रेकिंगसाठी जाताना एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही

10 वर्षांपेक्षा लहान मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गिर्यारोहणात सहभागी होता येणार नाही

स्थानिकांच्या घरात भोजन किंवा मुक्काम करता येणार नाही.

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार