आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान:मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण, अवकाळीची शक्यता

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम किनारपट्टीपासून गुजरातसह पंजाबच्या उत्तर सीमेदरम्यान निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे (ट्रफ) राज्यात २ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यात सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. द्रोणीय परिस्थितीचा प्रभाव आगामी ३ दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तसेच कोकण भागात पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. उत्तर भारतातही या स्थितीचा प्रभाव जाणवत आहे.

तापमान वाढले
महाराष्ट्रात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराहून वाहणारे वारे प्रभावी असल्याने थंडी कमी झाली. ३ दिवस वातावरण ढगाळ राहील, तसेच काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...