आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी माणसे दुर्मिळ, जी समाजाठी स्वत:ला वाहून घेतात:आमदार जगताप यांच्याप्रती CM शिंदेंची भावना, फडणवीसांसह घेतले अंत्यदर्शन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक वर्ष चिंचवड विधानसभा मतदारसंघात सक्रिय हाेते. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, लाेकप्रिय नेते म्हणून ते परिचित हाेते. आपल्या कर्तव्यात ते जागरुक हाेते आणि स्वत:चे जबाबदारीशी प्रामणिक हाेते. मतदारांसाठी जे काम करायचे त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील हाेते अशी माणसे दुर्मिळ असतात जी समाजाचे कामासाठी स्वत:ला वाहून घेतात. त्यांच्या जाणयाने समाज व पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे पार्थिवाचे दर्शन पिंपळे गुरव येथील निवासस्थानी घेतल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना मंगळवारी व्यक्त केले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लक्ष्मण जगताप हे आमचे अतिशय लाेकप्रिय आमदार आणि महत्वपूर्ण नेते हाेते. अतिशय अकाली त्यांचे निधन झाले आहे. कर्कराेगाशी त्यांनी झुंज दिली, त्यांचा मुळ स्वभाव हा संघर्षशील असल्याने त्यांनी विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी हार मानली नव्हती. परंतु, काळाने घात केला आणि ते आमच्यातून निघून गेले. पिंपरी चिंचवड शहरात भाजपच्या विस्तारात त्यांचा अतिशय माेलाचा वाटा राहिलेला आहे.

त्यांचा शहरातील सामान्य माणसांशी प्रचंड संर्पक असल्याने ते लाेकप्रिय हाेते. त्यांचा स्वभाव कल्पक असल्याने त्यांनी या भागात विविध प्रकल्प राबवले. आजारपणाच्या काळात त्यांचे काही घटना सातत्याने लक्षात राहतात. त्यात राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी पक्षाला गरज म्हणून ते अतिदक्षता विभागात रुग्णालयात उपचार घेत असतानाही मतदानास मुंबईला आले.

तब्येत खराब असताना पीपीई कीट घालून येत त्यांनी मतदान केल्याने राज्यसभा निवडणुकीतील विजय त्यांच्यामुळे सुकर झाला हाेता. त्यांच्यासारखी लाेक पक्षात असल्याने अशाप्रकारचा विजय आम्हास मिळू शकला. ते अतिदक्षता विभागात असताना त्यांची प्रकृती नाजूक हाेती, त्यावेळी त्यांना भेटण्यास आम्ही गेलाे. आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला व आमची विचारपूस करत राहिले. ही आत्मयीता, प्रेम बाेलके हाेते. याेद्धा असलेला नेता आमच्यातून गेल्याचे आम्हाला माेठे दुःख आहे. त्यांची पाेकळी कधीच भरुन येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...