आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची विकेट कधी काढायची हे करावं लागतं:स्पर्धेत कुणाला यश, कुणाला अपयश मिळतं, CM शिंदे म्हणाले- खेळाडूंचा डाटाबेस तयार करणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठली चाल कधी करायची. समोरच्याला कसे चितपट करायचे. कधी कुणाला खो द्यायचा, कधी कुणाची विकेट काढायची. हे सर्व करावे लागतं. पण स्पर्धेत कुणाला यश मिळते कुणाला मिळत नाही पण निराश न होता पुन्हा उठून उभे राहायला हवे. असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, क्रीडा मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन ,क्रीडा आयुक्त रणजित देवल, सुहास दिवसे ,विभागीय आयुक्त सौरभ राव व्यासपीठावर उपस्थित होते.

क्रीडा धोरणास शासनाने प्राधान्य दिले असून राज्यभरातील खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल तसेच त्यांच्या कामगिरीची ही विश्लेषण वेळोवेळी करण्यात येईल. राज्यात सध्या 155 क्रीडा संकुल असून आणखी 122 क्रीडा संकुल नव्याने उभारण्यात येतील. राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत राज्य सरकारने पाचपट वाढ केलेली आहे. खेळ खेळल्याने शरीर आणि मन सक्षम होऊन विविध आव्हाने खेळाडूंना पेलता येतील असे मत व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

शिंदे म्हणाले, मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे बारकाईने नियोजन करणे महत्वपूर्ण असते. या स्पर्धेचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले असून आपली क्रीडामंत्री यांना खेळात रुची असून ते विविध खेळात पारंगत आहे. सांगलीच्या महापुराच्या वेळी ते मदती करता गेले असताना, बोटीची वाट न पाहता थेट पोहत नागरिकांना वाचवण्यास गेले. त्यामुळे ते अतिशय उत्तम पोहणारे असून त्यांना इतरही खेळ चांगल्या प्रकारे येतातच.

राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी तब्बल 140 पदके मिळवत प्रथम स्थान पटकावले, त्यामुळे संबंधित खेळाडूंचेही मी कौतुक करतो. आपले राज्य केवळ उद्योग ,व्यवसाय, पायाभूत सुविधा यातच अग्रेसर नसून खेळाती देखील अग्रेसर आहे. कोरोनाच्या काळात खेळाडूंना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या होत्या. मात्र, आता सर्व अडचणी दूर होऊन खेळाडू दमदारपणे तयारी करत आहे.

​​​

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमादरम्यान गुफ्तगू करताना.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमादरम्यान गुफ्तगू करताना.

ऑलम्पिक नावातच विशेषता असून ती एक प्रकारे 'खेळांची दिंडी ' आहे. यामध्ये खेळाडूंच्या हाती वेगवेगळ्या ध्वजाच्या पथक असतात, मात्र त्यांचा एकच रंग हा 'खेळ '. खेळ आणि खेळाडू यांनाच या स्पर्धेत महत्त्व असते. या स्पर्धेत 39 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून तब्बल दहा हजार पेक्षा अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहे. खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, मेहनत याद्वारे प्रयत्न केल्यास त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळू शकेल. त्याचप्रमाणे ऑलिंपिक मध्येही जागतिक स्तरावर आपणास पदके मिळू शकतील असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र भेटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र भेटले.
बातम्या आणखी आहेत...