आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला:फटाके जरुर फोडा पण धूर काढू नका, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खोचक प्रत्युत्तर

बारामतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राजकारण सध्या तापलेले असल्याचे दिसत आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप करत आहेत. अशा वेळी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणीसांनी केले होते. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. फटाके जरुर फोडा पण धूर काढू नका असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

पवार कुटुंबीयांचे कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामतीत इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर पवार कुटुंबीयांवर स्तुती सुमने उधळली आहेत. ते म्हणाले की, 50 वर्षांपूर्वीची बारामती काय होती हे आपल्याला माहिती आहे. पवार साहेबांनी दगडालाही पाझर फोडून दाखवलेला आहे. परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत आणि ते मी करणार, ही वृत्ती असली पाहिजे' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका
या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली. भाषण संपवताना ते म्हणाले की, 'मला या कार्यक्रमात येण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणत आहेत की, फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ते ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही. सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा', असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...