आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरम इंस्टीट्यूटच्या इमारतीला आग:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्य यंत्रणेला समन्वय साधण्याचे निर्देश, तर माजी महापौरांना घातपाताचा संशय

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रशासनाला लवकरात लवकर आज विझवण्याच्या सूचना

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नाव प्लांट आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहेत. तर अजित पवारांनी फोनवरुन या घटनेचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयुक्तांच्या संपर्कात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला आहे. राज्य यंत्रणेला समन्वय साधण्याचे व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेचा फोनवरून आढावा घेतला. यांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. इमारतीमध्ये अडकलेल्यांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मुक्ता टिळक यांना घातपाताचा संशय
पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी या घटनेविषयी घातपाचा संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, 'दुपारी दिडच्या सुमारास ही आग लागली आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झालेली नाही. हा घातपाताचा प्रकार आहे असे प्रथमदर्शनी वाटत आहे. कारण ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचे काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे' असा संशय मुक्ता टिळक यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे.

गिरीष बापट म्हणाले, आग मोठी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही. तसेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे बापट यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...