आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • CM Uddhav Thackeray; Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Speaks To 3 Year Old Anshika Shinde After Her Mother Scolded For Social Distancing Violation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांचे प्रेम:सोशल डिस्टेंसिंगमुळे आईने रागावलेल्या चिमुकलीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले- 'आता कोणी रागवल्यास मला सांग...'

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंशिका शिंदेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या चिमुकलीसोबतच फोनवर बोलले, जिला सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आईने रागवले होते. मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ सीएम ऑफीसपर्यंत पोहचला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुलीच्या वडिलांना फोन केला.

चिमुकलीचे नाव अंशिका शिंदे आहे. अंशिकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात ती दुधवाल्याला पैसे देताना चुकून पैशांना हात लावल्यामुळे माफी मागत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन आल्यावर शिंदे कुटुंबिच चकीत झाले. यावेळी उद्धव ठाकरे अशिंकाला म्हणाले की, यापुढे जर आई-वडिलांनी तुला रागवले, तर तू मला सांग.

व्हिडिओत अशिंकाची आई तिला म्हणत आहे की, यापुढे पैसे देताना हात लावलास, तर 'उद्धव अंकल'ला सांगेल. ठाकरे मुलीच्या वडिलांना म्हणाले की, एका शिवसैनिकला त्रास देऊ नका. कॉल रेकॉर्डिंगमध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, माझे नाव घेऊन तुम्ही अंशिकाला रागावू नका. अंशिकाला बोलताना ठाकरे म्हणाले की, अंशिका तु आई-बाबांना सांग की, तु एक चांगली मुलगी आहेस आणि त्यांना त्रास देणार नाहीस.

बातम्या आणखी आहेत...