आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:यंदा एक ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू होणार , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात यंदाचा साखर हंगाम आव्हानात्मक होता. राज्यात साखर कारखानदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न झाल्याने राज्यासह मराठवाड्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदा ऊस हंगाम दीर्घकाळ चालला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पाऊस चांगला झाल्याने ऊस क्षेत्र वाढले आणि हीच परिस्थिती आगामी काळात राहणार आहे. त्यामुळे यंदा १ ऑक्टोबर रोजी कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न राहील. शेतकरी, कारखाने यांच्यासमोर ऊस तोडणी प्रश्न निर्माण झाल्याने यावेळी ॲप तयार करण्यात आले आहे. पुढील काळात त्याचा वापर करून नियोजनपूर्वक गाळप करण्यात येईल, अशी यांनी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, साखर कारखानदार माध्यमातून हार्वेस्टर वापर वाढविण्यात येत आहे. यांत्रिकीकरणाची गरज लक्षात घेता त्याचे वाहतुकीचे दर वाढवण्यात आले आहेत. आगामी काळात अ‍ॅपवर मिळणार गाळपाची माहिती

बातम्या आणखी आहेत...