आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Colleges In The Maharashtra Will Remain Closed Till Corona In Under Control, The Government Is Positive About Starting Libraries And Study Centers: Minister Uday Samant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:कोरोना आटोक्यात येईपर्यंत राज्यातील कॉलेज बंदच, ग्रंथालये-अभ्यासिका सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक : मंत्री उदय सामंत

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल

राज्यात महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. मात्र कोविड परिस्थिती संपुष्टात येईपर्यंत राज्यात कॉलेज सुरू करणे शक्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यातील अभ्यासिका आणि ग्रंथालये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.सामंत यांनी मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...