आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी:अपघातामुळे एक ट्रक रस्त्यावरच उलटला, दोन जण जखमी

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खोपोली एक्झिट या ठिकाणी दोन ट्रकची भीषण धडक झाली. त्यामुळे एक ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने मार्गावर तब्बल दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, घटनेत दोन जण जखमी झाले.

क्लिनर, चालक अडकले

खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रकने आपल्या समोरील ट्रकला धडक दिली. त्यामुळे तो ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला व गाडीतील क्लिनर आणि चालक जखमी होऊन अडकले. अपघाताची माहिती मिळताच, देवदूत पथक, खोपोली पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रकमधील क्लिनर आणि चालक यांना तातडीने बाहेर काढले आणि एमजीएम हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेतून नेले.

रस्त्यावर तांदळाच्या गोण्या

अपघातामुळे ट्रकमधील तांदळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्याही रस्त्यावर पडल्या. अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. सकाळी रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. घटनेबाबत पुढील तपास खोपोली पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...