आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 205- चिंचवड व 215- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ ॲप मोफत डाऊनलोड करता येते.
ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.
तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आणि समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली. पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 52 तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही इथापे यांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नागरीकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. यावेळी या रॅलीमध्ये निवडणूक नायब तहसिलदार श्वेता आल्हाट, विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार, बाळाराम शिंदे आदी उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.