आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षीय देशनाचा भीमपराक्रम:13.74 सेकंदांमध्ये 20 चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण; गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव!

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणेकरांसाठी एक अभिमानाची बातमी. आपल्या शहरातली लेक देशना नहारने वयाच्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये जागतिक रेकॉर्ड केले आहे. केवळ 13.74 सेकंदांमध्ये 20 चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण करीत तिने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. देशना ही बांधकाम व्यावसायिक आदित्य रसिक नहार यांची मुलगी आहे.

मान अभिमानाने उंचावली

देशनाला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ती हचींग स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेते. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नहार यांनीही अथक परिश्रम घेतले. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.

दोन वर्षांपासून मेहनत

गेली दोन वर्षे देशना मनापासून मेहनत घेत स्केटिंग शिकत आहे. तिच्या आजीने तिच्यासाठी विशेष मेहनत घेतली. लहान वयात तिच्यामधील खेळाडूला वाव देण्यासाठी, तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आजीने विशेष प्रयत्न केले. त्यातूनच तिला हे यश मिळाले आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद आहे, असे आदित्य नहार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...