आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वीच पळून गेली वधू:लग्नापूर्वीच संगणक अभियंता नवरी पळाली; नवरदेवाकडून तक्रार दाखल

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मे रोजी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याचे थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरवण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच नियोजित उच्चशिक्षित वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने मोठ्या उत्साहात दोघांचा बस्ता बांधला गेला. लग्नपत्रिका वाटप झाल्या, लग्नाची अंतिम तयारी करण्यात आली. परंतु लग्नापूर्वीच वधू कुणाला काही न सांगता पळून गेल्याने संतप्त झालेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांनी तरुणी, तिचे आई-वडील व भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.

बस्त्यासाठी ८० हजार खर्च
लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी वरपित्याने ८० हजार, लग्नपत्रिकेसाठी सात हजार, लग्न जमवणे, लग्नविधी, जेवण आदी कार्यक्रमांचे ७५ हजार रुपये असा एक लाख ७५ हजार रुपये खर्च केला. एक मे रोजी विवाहाची सर्व तयारी केली असताना नववधू लग्नापूर्वीच पळून गेल्याने पाहुण्यात व समाजात आपली बदनामी झाली. तसेच लग्नाचा खर्च करण्यास सांगून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विमानतळ पाेलिस पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...