आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन अध्यक्षपद; चपळगावकरांचे नाव चर्चेत:साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज निर्णय

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : वर्धा येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडीचा नवा अंक सुरू झाला आहे. ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे नाव अचानक पुढे आले आहे. दरम्यान, वर्धा येथे मंगळवारी (८ नोव्हेंबर) होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत नव्या संमेलनाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. शताब्दी वर्षानिमित्त आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला देण्यात आला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांशी नाळ जोडणाऱ्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी मागणी होत होती. त्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, नागपूर येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीमुळे द्वादशीवार अडचणीत सापडले. आता साहित्य महामंडळाची मंगळवारी बैठक होत असताना अचानक न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे नाव पुढे आले आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या सदस्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...