आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Congress Does Not Want To Curtail The Yatra 'Bharat Jodo Yatra', The Biggest Yatra Connecting The Country; Opinion Expressed By Prithviraj Chavan

यात्रेला काँग्रसेची म्हणून सुकुंचित करू इच्छित नाही:'भारत जोडो यात्रा' ही देशाला जोडणारी सर्वात मोठी यात्रा; पृथ्वीराज चव्हाणांचे मत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली 'भारत जोडो यात्रा' ही काँग्रेस पक्षाची रॅली म्हणून आम्ही तिला सुकुंचीत करू इच्छित नाही. ती तिरंगा झेंड्याखाली काढण्यात आली असून सर्व समविचारी पक्ष, लोक त्यात सहभागी झाले आहे. देशात अतातापर्यंत अनेक प्रकारच्या यात्रा झाल्या आहे परंतु 'भारत जोडो यात्रा' ही देशाला जोडणारी सर्वात मोठी यात्रा आहे असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी,अभय छाजेड, कैलास कदम, संगीता तिवारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान भारत जोडो यात्रा काढली आहे. महाराष्ट्र मध्ये ही यात्रा नांदेड जिल्ह्यात देगलुर येथे सुरवातीला येणार असून काँग्रेस नेते त्यांचे स्वागत करतील. काँग्रेस मध्ये 60 संघटनात्मक जिल्हे राज्यात आहे. प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी यात्रेत समविष्ट व्ह्याचे आहे ते सांगण्यात आले आहे. पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बुलढाणा मधील गावात पाठविण्यात येणार आहे. देशातील हा सर्वात मोठा कार्यक्रम असून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थ करण्यात आल्या आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर यांच्या यात्रा तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. अनेक सहयोगी राजकीय पक्षाच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आली असून राज्यात केवळ पाच ते सहा जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात नेमके कोणत्या दिवशी येणार त्यानुसार येणे - जाणे, पार्किंग, राहणे, भोजन, सुरक्षा अशी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विविध कार्यक्रम आयोजन

18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहरसाठी बुलढाणा जिल्हा मिळाला असून एकूण 1150 लोक नोंदणी झाली आहे. तीन नोव्हेंबर रोजी पुण्यात कोथरूड ते आगाखान प्लॅस दरम्यान हजार गाड्यांची रॅली काढण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक ठिकाणची माती आणि नद्यांचे पाणी गोळा करून त्याचे यात्रा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात भारत जोडो यात्रेचे तीन नोव्हेंबर रोजी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. अडीच हजार लोकांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...