आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींचा अपमान, भाजप आक्रमक:काँग्रेसने देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे, भाजप आमदाराची मागणी

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका आज भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

मिसाळ म्हणाल्या, चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, समृद्ध परंपरा असलेल्या आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपतीपदाचा अपमान झाला आहे. त्यामुळे सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे.

अन्यथा तीव्र आंदोलन

काँग्रेसकडून माफी मागितली जात नाही, तोपर्यंत भाजपतर्फे जागोजागी काँग्रेसच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मिसाळ यांनी दिला. मिसाळ म्हणाल्या, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुरू असलेल्या सोनिया गांधींच्या ईडी चौकशीस विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेस बट्टा लावणाऱ्या काँग्रेसजनांनी, देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान होत असताना मौन का बाळगले? गुरुवारी लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने चौधरी यांच्याकडून हा उल्लेख होत असताना सोनिया गांधी यांनी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचे दर्शन घडविले आहे.

सभागृहाच्या शिस्तीला बट्टा

मिसाळ म्हणाल्या, ​​​​​​​सभागृहाच्या शिस्तीला आणि सभ्यतेच्या संकेतास बट्टा लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार होत असतो. चौधरी यांच्या राष्ट्रपतींविषयीच्या या उद्दाम उल्लेखामुळे सभागृहाचा, राष्ट्रपतीपदाचा आणि देशाचा अपमान झाला आहे. सोनिया गांधी या स्वतः महिला असूनही त्यांनी महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या चौधरी यांना समज दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...