आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे 'पप्पू' : भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, त्याप्रमाणे राज्यातही एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.

सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने आणलेल्या जप्तीसंदर्भात पाटील म्हणाले, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा, अशी मागणी मी केली आहे. मी जे पत्र गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांना दिले, त्या कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी तयार केली आहे, असेही ते म्हणाले.

मनपात गावे समाविष्ट करून काय साध्य? : पुणे महानगरपालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पुणे राज्यातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेला जिल्हा बनला आहे. याबाबत पाटील म्हणाले, पुणे शहरात आधीच साडेअठ्ठावीस लाख लोकसंख्या असून अजून चार ते साडेचार लाख लोकसंख्या समाविष्ट करून राज्य सरकार नेमके काय साध्य करणार आहे. समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकासासाठी त्यांचे नगरपालिकांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...