आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:राज्यात सध्या शाळा नव्हे, ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय, शिक्षण आयुक्त सोळंकी यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय गृह मंत्रालयाचे स्पष्ट आदेश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असल्याने शाळा सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र १५ जूननंतर नवे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू करता येईल का, यावर शिक्षण विभागात विचार सुरू आहे. पण कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर सोळंकी म्हणाले, शाळा नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची शक्यता आजमावून पाहिली जात आहे. नियमित वर्ग कधी सुरू होतील, याविषयी लगेच काही सांगणे शक्य नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल.

केंद्राच्या परवानगीनंतरच...

व्हर्च्युअल क्लासरूम्स, शैक्षणिक वाहिनी, ई-कंटेंट अशा माध्यमांतून ऑनलाइन शिक्षणाच्या पर्यायांवर विचार सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यास आणि केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर शाळांच्या बाबतचा निर्णय घेता येईल, असे सोळंकी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...