आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम मजूर 14 व्या मजल्यावरून पडून ठार:पुण्यात इमारतीचा ठेकेदार अन् सुपरवायझरवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रोडवरील बहुमजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून काम करताना खाली पडून झालेल्या दुर्घटनेत बांधकाम मजूराचा मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी (30 नोव्हेंबरला) ही घटना घडली असून पोलिसांनी ठेकेदार व चौघांवर गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती शुक्रवारी दिली आहे. श्याम नेमा रविदास (वय 22, नर्हे,पुणे ) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे.

याप्रकरणी ठेकेदार लज्जाराम गुजर तसेच या सुपरवायझर रामकिस गुजर आणि सेफ्टी ऑफिसर रवी गवंडे व अजिंक्य यांच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबात श्याम यांचा भाऊ देवेंद्रकुमार यांनी तक्रार दिली आहे.

काय आहे घटना?

बाणेर भागातील पॅनकार्ड रोडवर कल्पतरू जेड नावाच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या कामाचा ठेका लज्जाराम तसेच इतरांनी घेतलेला आहे. दरम्यान, बांधकाम साइटवर श्याम हा फरशी बसविण्याचे काम करत होता. दोन दिवसांपुर्वी चौदाव्या मजल्यावरील ओपन बाल्कनीत श्याम हा काम करत असताना तो अचानक खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान इमारतीच्या ठेकेदार आणि सुपरवायझरने काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून कोणतीही उपाययोजना न करता सेफ्टी बेल्ट व सुरक्षा जाळी न बसवता काम करण्यासाठी भाग पाडले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँक अकाउंट लॉक होईल सांगून फसवणूक

बँक अकाउंट लॉक होईल असा फोन करून डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन पाच हजार रूपये खात्यातून दुसर्‍या खात्यात वर्ग करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 एप्रिल रोजी दिलीप प्रभाकर गाडगीळ (67, रा. शाहु कॉलनी, कर्वेनगर,पुणे) यांच्या सोबत घडल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

बातम्या आणखी आहेत...