आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवलेपुल परिसरातील अपघाताबाबत मुखमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश:वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कंटेनरने 24 वाहनांना उडवले. या अपघातात तब्बल 13 जण जखमी झाले. या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर हा हयगय करत वाहतूक नियमांची पायमल्ली करून चालवून अपघात कारणीभूत ठरला. तसेच इतर प्रवासी यांना जखमी करून झाले अपघाताबाबत पोलिसांना महिती न देता, त्याच प्रमाणे अपघातातील जखमींना वैद्यकीय मदत न करता अपघात स्थळावरून पळून गेला आहे म्हणून गुन्हा दाखल आहे. यामुळे त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात जीवितहानी नाही

रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास खेडशिवापुर बोगद्यातून भरधाव वेगाने हा कंटेनर आला. यावेळी नवले पुलावर हा कंटेनर आला असता, त्यावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने रस्त्यावरील तब्बल 24 वाहनांना ठोकरले. यात 12 जण जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही.

हे आहेत जखमी

या अपघात राहुल भाऊराव जाधव (रा.वारजे), शुभम विलास डांबळे, तुषार बाळासाहेब जाधव, आनंद गोपाळ चव्हाण (रा. सहयोग नगर, पुणे), राजेंद्र देवराम दाभाडे (रा. माणिकबाग पुणे), साहू जुनेल (रा. कोंढवा पुणे), ऑस्कर लोबो (रा. कोंढवा पुणे), मधुरा संतोष कारखानीस (वय 42, रा. वनाज), चित्रांक संतोष कारखानीस (वय 8), तनीषा संतोष कारखानीस (वय 16), विदुला राहुल उतेकर (वय 45.) अनघा अजित पभुले (वय 51, रा. वडगाव पुणे), अनिता अरुण चौधरी (वय 54, रा. राहटणी चौक) अशी जखमींची नावे आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

पुणे येथे नवले ब्रिजवर रविवारी रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, ते देखील तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...