आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवले पुलावर पुन्हा अपघात!:कंटेनरची दुभाजकाला धडक; 4 - 5 वाहनांचे नुकसान, परवाच घडला होता 48 वाहनांचा अपघात

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नवले पुलावर 48 वाहनांच्या अपघातानंतर खळबळ उडाली होती. त्या घटनेला काही तास उलटले नाही तो पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत चार ते पाच वाहनांचं नुकसान झालं आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. तीव्र उतारावर कंटेनरने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

जागेचा घेणार आढावा

रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. मंगळवारी पुन्हा झालेल्या अपघाताने या पुलाच्या आराखड्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर पुलाचा परिसरात होणारे अपघात कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शुक्रवारी पुन्हा प्रत्यक्ष जागेवर आढावा घेण्यात येणार आहे.

रविवारच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग

विशेष म्हणजे रविवारच्या भीषण अपघातानंतर प्रशासन जागे झाले. येथील अपघात टाळण्यासाठी उओय योजना सुरू करण्यात आल्या होत्या. पुणे पोलिसांच्या 100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील सेवा रस्त्यावरील अतिक्रम हटवले. त्याचबरोबर नवले पुलावर वारंवार घडणारे अपघात व त्यामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या आठ दिवसात संबंधित आराखडा तयार करुन, उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यात भर देण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुलाचा तीव्र उतार काढणार

रविवारी झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाची रचना चुकली असल्याचे कबुल केले होते. दरम्यान, या पुलाच्या ठिकाणी असलेले तीव्र उतार देखील काढण्यात येणार असून त्या संदर्भात उपाय योजना सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...