आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटील कोंडी फोडणार!:पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी;आयुक्तांसोबत भाजप प्रदेशाध्यक्षाकडून प्रत्यक्ष पाहणी

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सनसिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार असून, या कामास गती देण्याची सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांना सोमवारी दिल्या.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आयुक्ता विक्रम कुमार यांच्या सोबत प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. पुणे महापालिकेच्या प्रस्तावित कर्वेनगर ते सनसिटी पूल या प्रकल्पाची भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी कर्वेनगर स्मशानभूमी येथे पाहाणी करून सोमवारी आढावा घेतला.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाज पत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहाणी करून, आढावा घेतला.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांचाशी त्यांनी सविस्तर चर्चा करून कोणत्या अडचणी कामात आहे त्याची माहिती घेऊन त्या लवकर सोडवण्याबाबत सूचना केल्या. यावेळी प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने, प्रस्तावित पुलाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून, सदर प्रकल्पास गती देण्याची सूचना पाटील यांनी आयुक्तांना केली.

बातम्या आणखी आहेत...