आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Contribution Of Others Along With Mahatma Gandhi For Freedom Mahatma Gandhi Ate Sticks For The Country; But Some Revolutionaries Also Sacrificed Governor Koshyari

महात्मा गांधींना एकतर्फी श्रेय नको:स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकही हसत हसत फासावर गेले - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी महान होते. स्वातंत्र्यात त्यांचेही योगदान होते. मात्र, याबाबत एकतर्फी वागायला नको. काही क्रांतिकारकही हसत हसत फासावर गेले आहेत. त्यांचे योगदान विसरायला नको, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले, यासाठी महात्मा गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही मोठे योगदान आहे, त्यांनी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली. त्याचे योगदान विसरू नये. आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करतो, ते योग्य नव्हे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. क्रांतिकारकांचा इतिहास नव्या पिढीला माहिती नसल्याची खंतही राज्यपालांनी व्यक्त केली आहे.

महात्मा गांधींनी देशासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेच. मात्र, काही क्रांतिकारकांनी बलिदानही दिले, काहींनी आपली संपत्ती दिली. परंतु, हल्ली देशप्रेम कमी होत असल्याचे दिसून येत असल्याचेही राज्यपालांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये राजगुरू यांच्या 114 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम होता. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

पैशांसाठी राजकारण करतात

अनेक राज्यातील राजकारणी पैसे कमाविण्यासाठी राजकारण करतात म्हणून काही राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री जेलमध्ये गेले आहे. गेली अनेक वर्षे एका राज्याचा माजी मुख्यमंत्री जेलमध्ये असल्याचे सांगत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तर केवळ पैसा कमाविण्यासाठी देशाला स्वातंत्र मिळाले का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपाल लुटायला लागेल तेव्हा देश समृद्ध होईल का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या आधी खड्डा बनतो, मग रस्ता होतो. त्यासाठी नागरिकांनीच यापुढे क्रांतिकारक बनायला हवे असेही त्यांनी सांगत मागील काळात विकास झाला मात्र, कामाचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र देशासाठी अनेकांनी बलिदान दिले, कारण देश आहे तर आपण आहोत असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

अपार देशभक्ती असावी
राजगुरूप्रमाणे देशाची सेवा करताना बलिदान देण्याची वेळ आली तर ते देण्यासाठी देशभक्ती वाढविण्याची गरज आहे. नुसत्या जयंती सांजरी करुन काही होणार नाही, त्यासाठी आहुती द्यावी लागते. मी जे कमावतो ते राष्ट्राची संपत्ती आहे, तेव्हाच देशाचे भवितव्य सुधारेल.

बातम्या आणखी आहेत...