आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:फ्रिजचे दार लागल्याने वाद; सासूने केला सुनेचा खून

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रिजचे दार उघडत असताना पाय लागल्याने सुनेने शिवीगाळ केली. त्या रागातून सासूने सुनेचे डाेके फरशीवर आपटून तिचा खून केला. रितू रवींद्र माळवी (२८, रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) असे मृत सुनेचे नाव आहे. याप्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (४९) हिला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सून रितू हिला घरकाम जमत नाही. तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करून सासू कमला तिचा सतत छळ करत होती. दोन दिवसांपूर्वी चहा करताना फ्रिज उघडताना रितूला पाय लागल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी रितूने सासूशी वाद घातला. त्यामुळे कमलाने रितूला बेदम मारहाण करत तिचे डोके फरशीवर आपटले. यात रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाची बरीच लपवालपवी करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात रितूच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण‌ झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पाेलिसांनी कमलाची चौकशी केली असता तिने सुनेला बेदम मारहाण केल्याचे कबूल केले. दरम्यान, हा प्रकार घडला तेव्हा मृत महिलेचा आजारी पती दुसऱ्या खोलीत आठ वर्षांच्या मुलासह झोपलेला होता. त्यामुळे त्यांना हा प्रकार समजला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या भूमिकेचाही तपास करण्यात येणार आहे. तसेच संबंधित सासूचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...