आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी राहीलेल्या लेफ्ट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर लेखिका स्मिता मिश्रा यांनी “एलटी कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड?” या पुस्तकाचे लिखाण केले आहे. 18 डिसेंबर रोजी या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील स. पा. महाविद्यालयात होईल परंतु, या पुस्तक प्रकाशनावरून वाद सुरू झाला आहे.
पुरोगामी संघटनांकडून विरोध
लेफ्ट कर्नल पुरोहित यांच्या पुस्तक प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे भीमआर्मी बहुजन एकता मिशन अध्यक्ष दत्ता पोळ आणि मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी शुक्रवारी स पा महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून सदर कार्यक्रम महाविद्यालयात घेऊ नये अशी मागणी केली आहे.
प्राचार्यांना विनंती
इमनादर म्हणाले, सदर पत्राद्वारे आम्ही प्राचार्यांना विनंती केली आहे की, एसपी कॉलेज आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसमावेशक जनतेच्या हितासाठी आमच्या विनंतीचा विचार त्यांनी करावा. “एलटी कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड?” असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम 18 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे स. पा. महाविद्यालयाच्या आवारात, म्हणजे लेडी रमाबाई हॉलमध्ये नियोजित आहे.
म्हणून विरोध
कर्नल पुरोहित हे मालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत ज्यात सहा लोक मरण पावले आणि शंभरहून अधिक जखमी झाले. अत्यंत गंभीर प्रकाराचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. आणि इतर कायद्यांतर्गत गंभीर आरोप आहेत. पुस्तक प्रकाशनामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणि त्याचा उज्ज्वल ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल. हे प्रकरण मुंबईतील एनआयए न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि एसपी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशन करणे उचित नाही. ज्याचा शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही अशा उपक्रमांसाठी कोणालाही महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नका.
18 डिसेंबरला पुस्तक प्रकाशन
लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरील या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा 18 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता स. पा. महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर, पुणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग ,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. स्मिता मिश्रा यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून रेणू वर्मा या पुस्तकाच्या प्रकाशक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.