आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Controversy Over Economics Course In Pune University Hari Narke Said This Is A Journey Of Reverse Steps, 'Economics Is Not Religious' Chandrakant Patil

पुणे विद्यापीठातील अर्थवशीर्ष अभ्यासक्रमावर वाद:हरी नरके म्हणाले- हा उलट्या पावलांचा प्रवास, 'अर्थवशीर्ष धार्मिक नाही'- चंद्रकांत पाटील

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अर्थवशीर्ष अभ्यासक्रम सुरु करणे हा उलटया पावलांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठिला धरली जात आहेत हे धाेकादायक पाऊल आहे. उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील हे सारे भयंकर आहे, असे मत विचारवंत प्रा.हरी नरके यांनी शुक्रवारी व्यक्त केले आहे.

प्रा. नरके म्हणाले, माझा अर्थवशीर्षला विराेध नसून अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची संहिता धाेक्यात येऊ शकते. अर्थवशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम एखाद्या विद्यापीठाने सुरु करावा हे अतिशय दुर्देवी आहे. विद्यापीठाला सावित्रिबाईंचे नाव देण्यात आले असून अशा जबाबदार विद्यापीठाने खाजगी संस्थेसाेबत अशाप्रकारे अभ्यासक्रम सुरु करणे अनुचित वाटत आहे. एखाद्या खाजगी संस्थेने अर्थवशीर्ष बाबत काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत मी भाष्य करणार नाही. परंतु आमचा विराेध विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरु करुन त्याबाबत स्वत:चे सही, शिक्कयाचे प्रमाणपत्र देणे हा अनिष्ट पायंडा आहे. विज्ञानाचे दृष्टीने अशाप्रकारची बाब गंभीर आहे.

अर्थवशीर्षबाबत जागृत व्हावी हा उद्देश

पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभागाचे विभाग प्रमुख देवनाथ त्रिपाठी म्हणाले, अर्थवशीर्ष पठण काेर्स हा जागृती करण्यासाठी आहे. लाेकांना त्यांचा अर्थ समजावा, अधिक लाेक याच्याशी जाेडले जावे असा त्याचा उद्देश आहे. 21 दिवसांचा हा काेर्स असून दरदिवशी एक तास त्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर 21 दिवसांचे प्रशिक्षणाचे व्हिडिओ अपलाेड करण्यात आले. आपण काेणत्या दृष्टीने या काेर्सकडे पाहताे हे पाहणे महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी अर्थवशीष अभ्यासक्रम वादावर बाेलणे टाळले.

अर्थवशीर्ष धार्मिक नाही

पुणे विद्यापीठात अर्थवशीर्ष काेर्स सुरु करण्याचे संर्दभात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अर्थवशीर्ष हे काही धार्मिक नाही. काेणतीही प्रार्थना, आरती ही धार्मिक असू शकत नाही. अशाप्रकारचा काेर्स ज्यांना करावयाचा आहे ते करतील. ताे काही सर्वांसाठी बंधनकारक नाही असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...