आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवांचे स्वप्नभंग करणाऱ्या टोळीला बेड्या:लग्न होताच घर लुटून फरार होणाऱ्या नवरींची अख्खी टोळी अटकेत, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक कुटुंबांना लुटले

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित कुटुंबांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे गुन्हे शाखेने खोटे लग्न करुन कुटुंबांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खोटे लग्न करणारी टोळी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात सक्रिय होती. यातील महिलांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लग्न केले असून, लग्न झाल्यानंतर दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू आणि कपडे घेऊन पळ काढयचे.

गुन्हे शाखेने ज्या महिलेला पकडले आहे त्यांचे वय 22 ते 35 दरम्यान आहे. तसेच, या टोळीतील अजून बारापेक्षा जास्त महिला फरार आहेत. या टोळीने आतापर्यंत नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापुरतील लोकांना लुटले आहे.

असा केला पोलिसांनी टोळीचा भांडाफोड

पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा एका व्यक्तीकडून अडीच लाख रुपये लुटल्याप्रकरणी तपास करत होते. पीडितन सांगितले की, ज्योती पाटील(35) एका महिन्यापूर्वी त्याला भेटली होती. तिने स्वतःला गरीब असल्याचे सांगत लग्नाची मागणी घातली. यानंत दोघांचे जानेवारी महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर महिला तक्रारदाराच्या घरातून अडीच लाख रुपये घेऊन पसार झाली. मागच्या आठवड्यात पीडितने पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी महिलेच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर महिला विवाहीत असून, तिला दोन मुले असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिस निरीक्षक पद्माकर घावट यांनी याप्रकरणी पुढील तपास केला असता, ही एक मोठ टोळी असल्याचे त्यांच्या तपासात समोर आले. यानंतर त्यांनी या टोळीतील ज्योती पाटीलसह 9 महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात गेतले.