आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्याने धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध खटला दाखल; पवार, फडणवीसांसह भाजप नेते झाले होते सहभागी

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगल कार्यालय चालकाची आधीच नोटीस बजावून चौकशी

महाराष्ट्रात कोरोनोचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सामान्य नागरिकांसह राजकीय पुढाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारने आता अशा गर्दी जमवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार (भाजप नेते) धनंजय महाडिक यांच्यासह दोन जणांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवून कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केले असा आरोप आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या लग्नात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती. विविध नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यातील बहुतांश लोकांनी मास्क सुद्धा लावले नव्हते.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा येथील एका हॉलमध्ये रविवारी पार पडला होता. या लग्नात झालेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी आधीच मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. कोरोना काळातील नवीन नियमांची अंमलबजावणी सोमवारपासून लागू करण्यात आली. तत्पूर्वी 100 जणांची मर्यादा होती. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात 100 पेक्षा अधिक लोक जमा झाले होते असे सांगितले जात आहे.

मुंबईतील लग्नांमध्ये केवळ 50 जणांना परवानगी
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी पुढील 12 दिवस अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या दिवसांमध्ये प्रशासनाला सक्ती करावी लागणार आहे. लग्न किंवा समारंभांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि नवरदेवासह त्यांच्या नातेवाइकांविरुद्ध सुद्धा एफआयआर दाखल केला जाणार आहे. आता लग्नात केवळ 50 लोक एकत्रित येऊ शकतील. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार वाढत असल्याने ही उपाययोजना केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...