आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणूचा नवा ‘म्यूटंट’ आणि नागरिकांची बेशिस्त, ही राज्यातील कोरोनाच्या विस्फोटाची मुख्य कारणे आहेत. यावर कसोशीने स्वयंशिस्त पाळणे, शासकीय नियमावलीचे पालन करणे, हाच उत्तम उपाय आहे, असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले.
रविवारी रात्री त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन करणे आणि स्वयं अनुशासन बाळगणे हेच कोरोना विरुद्धचे शस्त्र आहे. कॅलिफोर्निया म्यूटेशन म्हणून ओळखले जाणारे ‘एल४५२आर’ आणि ‘इ४८४क्यू’ हे म्यूटेशन कोविडचा राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यास कारणीभूत असल्याचे सुरुवातीच्या निरीक्षणातून दिसत आहे, असे मांडे यांनी स्पष्ट केले. ‘लस’ प्रभावीच आहे : देशात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसी या प्रभावी आहेत. लसीकरणामुळे व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनची गरज पडणार नाही. तसेच, तो अत्यवस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता नगण्य असेल. आजवर झालेल्या संशोधनाच्या आधारे आपण हे म्हणू शकतो. काँटॅक्ट ट्रेसिंग नागरिकांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.