आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने महसूल घटला:अधिकाऱ्यांच्या पगारासाठी आता कर्ज काढण्याची वेळ, मंत्री वडेट्टीवार यांचे वक्तव्य

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मदत व पुनर्वसन, आरोग्य व इतर खाती साेडली तर इतर सर्व विभागांच्या कामांना कात्री

महाराष्ट्राला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीशी झुंजत असल्याने शासनाच्या महसुलातही माेठी घट झाली आहे. पुढील महिन्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पगार काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार म्हणाले, काेराेनाच्या लढाईत जे याेद्धा म्हणून काम करत आहेत त्यांच्या पगार-वेतनात कुठलीही कपात हाेणार नाही. मात्र, वेतन हे मागे-पुढे दिले जाईल, अशी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. मदत व पुनर्वसन, आरोग्य व इतर खाती साेडली तर इतर सर्व विभागांच्या कामांना कात्री लावण्यात येईल.

सारथी संस्था बंद होणार नाही :

वडेट्टीवार पुढे म्हणाले, ‘सारथी’ संस्थेला आवश्यकतेनुसार निधी दिला आहे. सारथी संस्था कुणीही बंद करणार नाही. ती यापुढील काळातही चालेल. मराठा विद्यार्थ्यांच्या ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्था अस्तित्वात आली त्यानुसार काम करेल. सारथीमध्ये पूर्वी ८४ जणांचा स्टाफ हाेता. परंतु सध्या ताे ७ ते ८ वर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...