आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘मला अजून दोन महिन्यांच्या बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जायचे आहे. मुलांच्या घरून कुणालाही येणे शक्य होते. परंतु त्यांनी त्या चिमुरड्यास आमच्यासारख्या अनोळखी लोकांच्या ताब्यात दिले. आई-बाप क्वाॅरंटाइन असल्याचे सांगतात. पण पोलिसांच्या मदतीने ते येऊ शकले असते. गेल्या दोन महिन्यांत मी सगळी नाती संपल्याचे पाहतो आहे. मी आजवर ३७० जणांवर दाहसंस्कार केले अाहेत’ अरुण शिवशंकर जंगम मला सांगत होते. ते एस. ए. एंटरप्रायझेसचे संस्थापक आहेत. पुण्यात त्यांच्या कंपनीला प्रशासनाने कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याचा ठेका दिला आहे. खासगी कंपनीकडून अंत्यसंस्कार करणारे हे एकमेव शहर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या शहराने नाते विभक्त होताना पाहिले आहे. कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची त्यांची जबाबदारी आहे. महापालिकेच्या आरोग्याधिकारी कल्पना बलवंत सांगतात, कोरोन पॉझिटिव्हच्या मृत्यूनंतर नातेवाईक मृतदेह टाकून पळून जात होते. कोणी फोन बंद ठेवलेला होता. तर कोणी येण्यास तयार नव्हते. अंत्यसंस्कारास एनओसी घेण्यासही येत नव्हते. एका स्मशानभूमीत एक केअरटेकरच कोरोना पॉझिटिव्हची बॉडी पाहून पळून गेला. नायडू रुग्णालयात एका मातेचा मृत्यू झाला. आम्ही मुलांची १२ तास वाट पाहिली. त्याला निरोप देऊनही तो आला नव्हता. उलट डॉक्टरांशी तो उद्धटपणे बोलला. अशा घटनांनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय), एस. ए. इंटरप्रायजेस, अल्फा या तीन धार्मिक कंपन्या पुढे आल्या. त्यांनी धर्मानुसार अंत्यविधी करण्याची जबाबदारी उचलली. पुण्यात ही व्यवस्था दोन महिन्यांपासून व्यवस्थित सुरू होती. पण अचानक काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टि्वट करून म्हटले, मुंबईत मुस्लिमांवर अंत्यसंस्कार करणारी पीएफआय ही देशद्रोही संघटना आहे. यावर राजकारण तापले. काही लाेकांनी तर म्हटले, पुणे महापालिका तर भाजपच्या ताब्यात आहे. त्यांनीही पीएफआयला काम दिले आहे. पुण्यात पीएफआय या संस्थेचे कंत्राट काढण्यात आले. पुण्यात विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला. आता पीएफआय न्यायालयीन लढाई लढणार आहे. मुस्लिमांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आता उन्नत संस्थेला देण्यात आली आहे, तर हिंदूंचे अखेरचे विधी खासगी कंपनी एस. ए. एंटरप्रायझेस ही संस्था करते आहे.
पीएफआय, पुण्याचे अध्यक्ष राजी यांनी सांगितले, आम्ही पॉझिटिव्ह रुग्णांची बॉडी दफन करण्याचे काम कोणी हात लावण्यास तयार नसल्यापासून सुरू केले. विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी आरोप करणारेच राष्ट्रविरोधी असल्याचे सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज येतो आणि टीम मृताच्या धर्मानुसार तयारी सुरू करते
पुणे महापालिकेने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून यात सर्व कोविड रुग्णालये, अंत्यसंस्कार करणाऱ्या तीन संस्था, रुग्णवाहिका, महापालिका अधिकारी व कर्मचारी आहेत. काेविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूनंतर या ग्रुपवर सर्व माहिती दिली जाते. लगेच या तीन संस्था तयारीला लागतात. संस्थेतील लोक बॉडी स्मशानभूमीत अथवा कब्रस्तानात उतरवतात. मार्गदर्शक तत्त्वे व धर्मानुसार त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.