आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या चौपटीने वाढत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आढावा बैठक साेमवारी पुणे महानगरपालिकेत पार पडली. २७ डिसेंबर ते एक जानेवारीदरम्यान सहा दिवसांत झपाट्याने रुग्णसंख्या शहरात वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सक्रिय रुग्णसंख्या चाैपट वाढल्याने नवीन बाधित रुग्णांचे विश्लेषण करण्यात येत असून ८० ते ८५ टक्के नवीन बाधित हे दाेन्ही लसीचे डाेस घेतलेले आहेत. या रुग्णांना कमी त्रास जाणवत असून रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माेहाेळ म्हणाले, शहरातील अडीच हजार रुग्णसंख्येपैकी ३४६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ४७ रुग्ण आेमायक्राॅनचे आहेत. यंदा आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर असलेली रुग्णसंख्या एक टक्क्यापेक्षा कमी असल्याने चिंतेचे कारण नाही. मात्र, दक्षता बाळगणे आवश्यक आहे. आैषधांचा साठा महापालिकेजवळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असून १८०० बेड महापालिकेकडे तयार ठेवण्यात आले आहे. १२ आॅक्सिजन प्लँट सुरू असून नऊ हजार ५०० लिटर प्रतिमिनिट त्यांची उत्पादन क्षमता आहे. जम्बाे हाॅस्पिटलचे स्ट्रक्चरल आॅडिट, फायर आॅडिट करून घेण्यात आले असून २४ तासांत सर्व मशीनरी सुरू हाेतील, अशी तयारी करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर : ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवासी आहे. त्याने कुठेही प्रवास केलेला नाही. मात्र, त्यांची मुलगी गोव्याहून नुकतीच आली आहे. यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्ती एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण आहे. पहिल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
७८ हजार डोस शिल्लक
पुण्यात आगामी काळात १५ ते १८ वयाेगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. ७८ हजार लसीचे डाेस पुण्यात शिल्लक आहेत. तीन लाख लाेकांनी पहिला डाेस घेतला असून ८४ दिवसांनंतरही दुसरा डाेस घेतलेला नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळे या नागरिकांच्या लसीकरणावर भर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.