आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह महिला पुण्यातून विमानाने थेट दुबईला, पोलिसात तक्रार दाखल 

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाकडून प्रत्येक प्रकारची काळजी घेण्याचं आवाहान सातत्याने केलं जात आहे. प्रवास बंद आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. या दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित महिला पुण्यातून  विमानाने दुबईला गेली आहे. शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी कोरोनाबाधित महिला रहात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमधील सदस्यांनी हिंजवडी पोलीसात पत्र देत तक्रार दाखल केली आहे. 

आता हिंजवडी पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलैला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती होती. या महिलेने खासगी रुग्णालयात टेस्ट केली. तेव्हा ती पॉझिटिव्ह असल्याचेही समोर आले. यावेळी महिलेला सौम्य लक्षण होती. यामुळे डॉक्टरांकडून महिलेला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे महिला शुक्रवारपर्यंत सहा दिवस घरात क्वारंटाइन होती. मात्र, त्यानंतर आता ही महिला दुबईत राहत असलेल्या पतिकडे विमानाने गेली असल्याची माहिती आहे. सोसायटीधारकांनी यावर प्रश्न निर्माण करत, ही महिला खोट बोलून विमान प्रवास करून दुबईला गेल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.