आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आंदोलन:पुण्यातील कठोर निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी भाजपचे आंदोलन, खासदार गिरीश बापट कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या ताब्यात

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन घोषित करत पुण्यात अनेक निर्बंध लादण्यात आले

पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहेत. यावर आळा घालण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश काढण्यात आले. या अंतर्गत पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाची असलेली 'पीएमपीएल' सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. याचा निषेध करत भाजपकडून पहिल्याच दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील पीएमपीएमएल सेवा बंद या निर्णयाचा भाजपकडून जोरदार विरोध केला जात आहे. हा विरोध दर्शविण्यासाठीच खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या ॲाफिस बाहेर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत असताना त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बापट म्हणाले की, 'आम्हाला राजकारण करायचे नाही, तर सरकारला सहकार्य करायचे आहे. चुकीच्या नियोजनाचा किती मोठा फटका बसतो याचा अनुभव यापूर्वी घेतला आहे, यावरुन सरकारने शहाणे व्हावे' असे बापट म्हणाले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन घोषित करत पुण्यात अनेक निर्बंध लादण्यात आले. पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याोसोबतच, पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. मात्र, भाजपकडून पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध करण्यात आला. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आंदोलन करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...