आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Corona Vaccine Dry Run Starts Today At 3 3 Centers In 4 Districts Of Maharashtra Including Pune, Nandurbar, Nagpur And Jalna, 25 25 People Get Dummy Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाची रंगीत तालीम:पुणे, नागपूर आणि जालन्यासह नंदुरबारमध्ये 3-3 सेंटर्सवर आज कोरोना व्हॅक्सीनच्या ड्राय रन सुरू, 25-25 लोकांना डमी लस

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालन्यातील अंबड येथील आरोग्य केंद्रावर लसीकरणाची रंगीत तालीम - Divya Marathi
जालन्यातील अंबड येथील आरोग्य केंद्रावर लसीकरणाची रंगीत तालीम
  • जालन्यातील लसीकरण केंद्रावर आरोग्य मंत्र्यांनी भेट देऊन केले निरीक्षण

एकीकडे देशात कोरोना व्हॅक्सीनच्या एमरजन्सी अप्रूव्हलची चर्चा असताना दुसरीकडे महाराष्ट्रात या लसीकरणाच्या ड्राय रन सुरू झाल्या आहेत. राज्यात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार शहरांमध्ये या ड्राय रन घेतल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येक शहरातील तीन-तीन केंद्रांमध्ये प्रत्येकी 25-25 लोकांना डमी लस टोचल्या जात आहेत. या निमित्त जालन्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः केंद्रांवर जाऊन या कार्यपद्धतीचा आढावा घेत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले.

पुण्यातील एका सेंटरवर ड्राय रनची माहिती घेताना आरोग्य कर्मचारी
पुण्यातील एका सेंटरवर ड्राय रनची माहिती घेताना आरोग्य कर्मचारी

नागपूर, पुणे आणि जालन्यासह नंदुरबारमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरु झाले आहेत. यामध्ये कोणालाही प्रत्यक्ष कोरोना लस दिली जात नाही. आरोग्य मंत्री टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. या प्रक्रियेत लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अर्धा तास त्यांना ऑब्झर्व्हेशन रुममध्ये ठेवण्यात येईल. या ठिकाणी टीव्ही, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था असेल. लस घेणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा ताण येऊ देणार नाही असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षण प्रक्रियेला तांत्रिक भाषेत अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन म्हटले जाते. अर्धा तास थांबल्यानंतर काही जणांना काही परिणाम जाणवल्यास त्यांचे निरीक्षण केले जाईल. इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन अशा तीन पायऱ्या आहेत. कुणालाही चक्कर आली, तर त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रशिक्षित नर्स या ठिकाणी तैनात असतील. एका बूथवर शंभर जणांना लसीकरणाचे नियोजन केले जाईल. ओळखपत्र आणि कोरोना लस अ‍ॅपची पडताळी करणारे पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि मग वॅक्सिनेशन बूथ असे टप्पे पार करुन जावे लागेल.

नागपुरातील एका आरोग्य केंद्रावरील चित्र
नागपुरातील एका आरोग्य केंद्रावरील चित्र

नागपुरात सुद्धा तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम आज सुरू करण्यात आली. यापैकी एक सेंटर असलेल्या डागा रुग्णालयात काहीसा गोंधळ दिसून आला.

नागपुरात डागा हॉस्पिटल, इतवारी; केटी नगर रुग्णालय, फ्रेंड्स कॉलनी; आणि कामठी उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात आले. यापैकीच एक डागा रुग्णालयात दीड तास उशीर झाला. सकाळी 9.30 नंतरही या ठिकाणी साफ-सफाईची कामेच सुरू होती.

हिंजवडी-माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. डी एन पाटील, पुणे जिल्ह्य परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , जिल्ह्य आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी भेट देऊन ड्राय रन लसीकरणाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...