आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचे औषध लवकर येणार असल्याच्या चर्चांचे सीरम इंस्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, कोरोनाचे व्हॅक्सीन या वर्षीच्या अखेरपर्यंत येईल. अदर पुण्यातील एका मेडिकल इक्युपमेंटच्या लॉन्च इव्हेंटमध्ये बोलत होते.
'आम्ही एक सुरक्षित आणि परिणाम करणारी व्हॅक्सीन आणण्याच्या प्रयत्नात'
पुण्यातील एका इव्हेंटदरम्यान अदर म्हणाले की, ‘व्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील यशस्वी ट्रायलनंतर आपण याविषयावर चर्चा करू. लवकरच बाजारात कोरोनाचे व्हॅक्सीन येणार असल्याची माहिती समोर येत आहे, पण आम्ही घाई करणार नाहीत. आम्ही एक सुरक्षित आणि चांगला परिणाम करणारी व्हॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. जेव्हा आम्हाला आम्ही तयार केलेल्या व्हॅक्सीनवर विश्वास बसेल, तेव्हाच आम्ही याची घोषणा करू.’
'सध्या आपण आपल्या क्षमतेपेक्षा कमी चाचण्या करत आहोत'
भारतात सध्या टेस्टिंग किट्स आणि लॅब्सची कमतरता नाही. अनेक टेस्टिंग किट्स तयार करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आम्हाला आशा आहे की, भारत या टेस्टिंग किटला एक्सपोर्ट करण्याची मंजूरी देईल. यावेळी ते म्हणाले की, सध्या भारतात क्षमतेपेक्षा कमी चाचण्या होत आहेत.
'कोरोना संक्रमित शोधण्यासाठी चाचण्या, हाच एक उपाय'
पूनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पूनावाला यांनीदेखील कमी टेस्टिंगवर प्रश्न उपस्थित केले. ते यावेळी म्हणाले की, देशात क्षमतेपेक्षा कमी चाचण्या होत आहेत. लोक स्वतःहून चाचणीसाठी पुढे येत नाहीत. टेस्टिंगशिवाय संक्रमितांना शोधणे शक्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.