आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनात बदल:कोरोना संक्रमण पाहता पुणे येथील एका पेट्रोल पंपाचा नवीन उपक्रम, आता ग्राहक स्वत: पेट्रोल आणि डिझेल भरू शकतील

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेट्रोल भरल्यानंतर ग्राहक तेथील कार्ड स्वॅपिंग मशीन व क्यूआर कोडद्वारे स्वतः पेमेंट करू शकतील
Advertisement
Advertisement

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यातील एका पेट्रोल पंपाने वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या पंपावर ग्राहक स्वतः मशीनमधून पाईप उचलून पेट्रोल भरू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पातून हा प्रयोग सुरू केल्याचे पेट्रोल पंपाकडून सांगण्यात आले.राज्यातील एखाद्या पेट्रोल पंपाद्वारे अशाप्रकारचा पहिला प्रयोग करण्यात आला आहे. 

पंपावर येणाऱ्यांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ केले जातील 

सोशल मीडियावरील लोक विचारत आहेत की जेव्हा बरेच ग्राहक त्यास स्पर्श करतील तेव्हा संक्रमणाचा धोका वाढणार नाही का? यावर उत्तर देताना पेट्रोल पंपाकडून सांगण्यात आले की, पंपावर पोहचल्यानंतर ग्राहकांना सर्वप्रथन सॅनिटायझर दिले जाईल. तेथील उपस्थित कर्मचारी पेट्रोल भरण्याबाबत मार्गदर्शन करतील. पेट्रोल भरल्यानंतर तेथील कार्ड स्वॅपिंग मशीन आणि क्यूआर कोडद्वारे ग्राहक स्वतः पेमेंट करू शकतील. 

पेट्रोल पंपाच्या या प्रयत्नांचे ग्राहकांनीही कौतुक केले

ग्राहकांचे म्हणणे आहे की, हा प्रयत्न कौतुकास्पद आहे आणि यामुळे वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली पेट्रोल चोरीच्या तक्रारीचे समाधान होईल. ग्राहकांच्या समाधानाने पेट्रोल भरून तेथून जाऊ शकतील.

Advertisement
0